रवी जाधवांचा आरोप; निवडून दिलात मग आता पाच वर्षे सहन करा…
सावंतवाडी, ता.२४: विद्यमान आमदार आणि लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्यामुळे सावंतवाडी शहराची अवस्था फार बिकट बनली आहे. शहरातील रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याची समस्या, आरोग्य यंत्रणा हे डळमळीत झाले आहे. मात्र याचे खापर प्रशासनावर फोडले जात आहे, असा आरोप सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव यांनी केला आहे.
दरम्यान निवडणुकीत मते विकत घेणाऱ्या व्यक्तींकडून हा प्रकार सुरू असल्यामुळे आता सावंतवाडी शहराची झालेली परिस्थिती मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवली आमची सुंदरवाडी? असा सवाल करीत निवडून दिलाय मग आता पाच वर्षे सहन करा, असा टोला श्री. जाधव यांनी लगावला आहे याबाबत श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी आमदारासह लोकप्रतिनिधी वर टीका केली आहे. तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या काळात चांगले काम झाले. परंतू नंतरच्या काळात दुर्दैवाने चांगले काम झालेले नाही, अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.