डॉ.जयेंद्र परुळेकर;त्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची माहिती नक्कीच देऊ…
सावंतवाडी ता.१५: आंबोली-चौकुळ काबूलायतदार जमीन प्रश्न आपण सोडवला असे सांगून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली जनतेची दिशाभूल करीत आहेत.मात्र हा प्रश्न आमच्या पालकमंत्र्यांनी सोडवला असून तो सुटण्यासाठी केसरकरांनी घेतलेल्या परिश्रमांची माहिती आमच्याकडे आहे.आणि ती नक्कीच सगळ्यांसमोर सादर करू,असा दावा शिवसेनेचे नेते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केला.श्री तेली विकासाचा मुद्दा घेऊन जनतेला भावनिक आव्हान करीत आहे.मात्र त्यांनी सुद्धा सहा वर्ष विधान परिषदेची आमदारकी उपभोगली आहे.त्यांनी त्याकाळात किती विकास केला याचे पहिल्यांदा आत्मचिंतन करावे,व नंतरच विकासाची आवाहने जनतेसमोर ठेवून आपला पुढच्या आमदारकीचा प्रचार करावा असाही टोला श्री.परुळेकर यांनी यावेळी बोलताना लगावला.