रेडी व तुळस येथील स्वाभिमान-भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश….

2

वेंगुर्ले ता.१४:  येथील युवसेनेच्या मेळाव्यात रेडी येथील स्वाभिमानाच्या ग्रामपंचायत सदस्य नामदेव राणे, श्रीकांत राऊळ, मंदाकिनी मांजरेकर यांच्यासह युवकांनी तसेच तुळस येथील भाजपचे गौरव नाटेकर, साईदत्त पडते, सुहास सावंत यांच्यासह युवकांनी आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी बोलताना केसरकर यांनी सांगितले की लोकांचा ओढा शिवसेनेकडे असून गेल्या ४-५ दिवसात जवळपास पाच हजाराऊन अधिकांनी सेनेत प्रवेश केला हा शिवसेनेचा विजय आहे.
येथील साई मंगल कार्यालयात युवासेनेचा मेळावा पार पडला. यावेळी दीपक केसरकर बोलत होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर सेनेचे नितीन नांदगावकर, रुची राऊत, महिला जिल्हाप्रमुख जानव्ही सावंत, अण्णा केसरकर, उपनगराध्य अस्मिता राऊळ, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, विक्रांत सावंत, सागर नाणोसकार, वेंगुर्ले युवासेना प्रमुख पंकज शिरसाठ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, आबा कोंडसकर, सचिन वालावलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले की, या वेंगुर्ले शहरासाठी मी कोट्यवधींचा निधी दिला अनेक विकास कामे आणली त्या मुळे नगराध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वी माझा सत्कार केला होता, मात्र ते आज मी कधीच निधी दिला नाही असे सांगतात यावरून त्यांची स्मरणशक्ती कमी झाली असे वाटते. मात्र माझे काम लोकांना माहीत आहे. या मतदार संघात नारायण राणेंचेच पिल्लू राजन तेली विरोधात उभे आहेत. पण या भागातील जनता हुशार आहे. ज्यांनी पाच महिने सावंतवाडी जेलची हवा खाल्ली आणि ज्यांच्या नावावर ४२० केस दाखल आहे अशा बदनाम माणसाला शिवरमराजेंच्या स्पर्शान पावन झालेल्या आमदारकीच्या खुर्चीवर येथील जनता कधीही बसवणार नाही, त्यामुळे आपला म्हणजे शिवसेनेचा विजय होणारच आहे.
राणे सारख्या दृष्ट प्रवृत्ती विरोधात हा माझा लढा आहे. त्यामुळे जिल्ह्यात तिन्ही ठिकाणी राणेंनी जी पिल्ले उभी करून पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तो येथेच आपण मोडून घालूया. २१ तारीखला धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन जोरात दाबून रावणाची तिन्ही तोंडे एकाचवेळी उडवून टाकूया असे आवाहन त्यांनी केले.

8

4