कोकिसरे विद्यालयातील मुलींच्या क्रिकेट संघाची सलग दुस-या वर्षी विभागस्तरावर निवड…

133
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 वैभववाडी, ता.१५ :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोकिसरे च्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले. या विजेत्या संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
मुलींच्या या संघात चित्रा प्रभू ( कर्णधार ) , अस्मिता तांबे, भक्ती कोकरे ,रेश्मा किंजवडेकर, भाग्यश्री मुरकर, वैष्णवी घाडी,चैताली कोकरे, अवंती रावराणे, पूनम आयरे, स्वाती राशिवटे, वेदिका नारकर, संचिता तानवडे , प्रणाली नेवरेकर, सलोनी गुरव, अक्षता चव्हाण, सानिका नारकर व कोमल राऊत यांचा समावेश आहे. गतवर्षी विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांकापर्यंत झेप घेणाऱ्या या संघाकडून याहून मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विजेत्या संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रामचंद्र घावरे, संघव्यावस्थापक स्वप्नील पाटील , क्रिकेट कोच चंद्रकांत जाधव , मयुर गोरुले, सचिन राशिवटे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. द. सो. पवार, उपाध्यक्ष पी.जी.वळंजू, प्राचार्य विनोद गोखले यांनी संघाचे अभिनंदन केले तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग वैभववाडी , गटशिक्षणाधिकारी, क्रीडा समन्वयक व शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष , सचिव यांनीही संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

\