महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज होणार भाजपात विलीन…

2

दत्ता सामंत यांच्यासह 35 पदाधिकारी करणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

कणकवली, ता.१५ :

कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळातच कणकवलीत येणार आहेत. आजच्या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजप मध्ये विलिनीकरण होणार आहे. यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात स्वाभिमान पक्षातील ३५ पदाधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. आजच्या भाजपच्या सभेसाठी माजी आमदार भाई गिरकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

1

4