कु. अंजली खडतरे सेट परीक्षा उत्तीर्ण…

2

 वैभववाडी.ता,१५:

श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे प्रशालेची माजी विद्यार्थीनी कु.अंजली शंकर खडतरे हिने सन २०१९ मध्ये घेतलेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. ती सेट परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
तीचे दहावीपर्यंतचे शिक्षण
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे हायस्कूल मध्ये झाले. तर ११ वी ते बीएसस्सी पर्यंतचे सर्व शिक्षण सोलापुर जिल्ह्य़ातील सांगोला महाविद्यालयात झाले. ती बीएसस्सी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली. त्यानंतर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून एमएसस्सी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. अंजली खडतरे ही कोकिसरे विद्यालयातील विज्ञानचे शिक्षक तथा शिक्षक भारती सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष शंकर खडतरे यांची कन्या आहे.
अंजली खडतरे सध्या सांगोला येथील फॅबटॅक इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

2

4