कोकणात नवीन अध्याय निर्माण करणार

2

नितेश राणे : कणकवलीत भाजपची सभा

कणकवली, ता.१५ : मला कोकण विकासाचा नवा अध्याय भाजपच्या माध्यमातून निर्माण करायचा आहे. माझा कुणीही प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. मी गेल्या ५ वर्षात मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालोय. त्यामुळे प्रत्येक मतदारांची साथ मला नक्की मिळणार आहे. विरोधी पक्षाचा आमदार असताना जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी प्रयत्न केला. अनेक कामे मार्गी लावली असे प्रतिपादन भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी केले. ते कणकवली येथील महायुतीच्या सभेत बोलत होते.
श्री.राणे म्हणाले, केंद्रात, राज्यात भाजप सरकार असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन होत आहे. सर्वसामान्यांना स्वप्न पाहण्याची आणि ती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. रोजगारासाठी आता मुंबईला जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग आणि कोकणातच रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळे मतदारांनी मला साथ द्यावी असेही आवाहन नितेश राणे यांनी केले..

1

4