दोन वर्षात सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावणार…

71
2
Google search engine
Google search engine
Google search engine

देवेंद्र फडणवीस: राणे आमच्याकडे आल्यामुळे आता भाजपकडे “डबल इंजिन”…

कणकवली, ता.१५ : जागेची उपलब्धता झाली नसल्याने महत्त्वाकांक्षी असा “सी वर्ल्ड” प्रकल्प मागील पाच वर्षे रखडला होता. मात्र हा प्रकल्प आम्ही पुढील दोन वर्षात मार्गी लावू,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.याखेरीज विमानतळावरून लवकरच नियमित विमानसेवा सुरू होईल.वेंगुर्लेत मत्स्यबीज उपक्रम,सिंधुदुर्ग किल्यासाठी ६२ कोटी,तर पानबुडी साठी ६५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.या खेरीज सिंधुदुर्गातील पहिलं पंचतारांकित हॉटेल लवकरच सुरू होईल आणि जगभरातील पर्यटकांची पावलं सिंधुदुर्ग कडे वळतील,अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आमदार नितेश राणे यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राणेंचे इंजिन आता आमच्याकडे आलेल आहे.त्याला आता भाजप सरकारच दुसरे इंजिन जोडून कोकण विकासाची गाडी सुसाट धावणार आहे.नवे असे मंडळ स्थापन झाल्यानंतर सिँधुदुर्गात निश्चितपणे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल.गेल्या पाच वर्षात आम्ही सात लाख लोकांना राज्यात घरे उपलब्ध करून दिली आहेत.तर पुढील पाच वर्षात दहा लाख घरांचे नियोजन केले.एवढेच नव्हे तर २०२२ पर्यंत राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

\