तर…शिवसेना आणी नारायण राणे हे वाद निश्चीतच संपतील

2

दीपक केसरकर; येत्या दोन दिवसात भाजपातून राजन तेलींची हकालपट्टी निश्चित…

सावंतवाडी ता.१५: नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना व राणे यांच्यात गेली अनेक वर्षे सुरू असलेले वाद निश्चितच संपतील.राणे आता योग्य पक्षात गेले आहेत.त्यामुळे त्यांचे आणि माझे वैर सुध्दा संपेल,पण आता त्यांनी संघाची विचारधारा आणि तत्वज्ञान आचरणात आणणे गरजेचे आहे,असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला.भाजपात बंडखोरी करून माझ्या विरोधात निवडणूक लढविणार्‍या राजन तेलींची लवकर पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल,येत्या दोन दिवसात भाजपचे कार्यकर्ते माझ्या प्रचारात दिसतील.राणे पुत्रांमध्ये निर्माण झालेला वाद हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे.अशा वादावर मी माझी राजकीय पोळी भाजणार नाही,असे ही ते म्हणाले.श्री केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी संपर्कप्रमुख शैलेश परब उपस्थित होते.

यावेळी आदीत्य ठाकरे याच्या खांद्याला खांदा लावुल काम करण्याची नितेश राणे यांनी दर्शविलेल्या सहमती वरून राणेंच्या पुत्रामध्ये दिसुन आलेल्या मतभेदाबाबत,त्यांना विचागरले असता,ते म्हणाले की,तो त्याच्या कुटूबामधला वैयक्तिक वाद आहे,कोणाच्या कुंटूबात तेढ निर्माण करून आपली राजकिय पोळी भाजणार्‍यापैकी मी राजकारणी नाही.ते एक कुंटुब असुन ते कुंटूबच राहीले पाहीजे.मात्र राणेशी माझा वैयक्तिक कोणताही वाद नाही माझा वाद राहीला तो त्याच्या प्रवृत्तीशी त्याच्या विचारधारे विरोधात आहे.त्यांची काम करण्याची पध्दत राहीली आहे.त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यानी हिसाचार निर्माण केला आहे.त्यामुळे माझा लढा या प्रवृत्ती विरोधात राहीला आहे.त्यामुळे राणे कुटुबियामध्ये जर वाद असतील तर जिल्हाचा पालकमंत्री म्हणून मी कधीही घेणार नाही,
राणेनी ज्याप्रमाणे सांगितले कि मुख्यमंत्री सांगतील तसा वागेन त्याप्रमाणे त्यांनी आपली काम करण्याची पध्दत बदलावी या जिल्हयात कोणाला मारहाण न झाली तर आमच्या वैरत्वही कमी होईल.शिवाय त्यांनी बाळासाहेबावर केलेल्या टिकेची जाहीर माफी मागितल्यास शिवसेना व राणे यांच्यातील वाद मिटेल.नारायण राणेचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाला याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, नियतीने खेळलेला हा डाव असुन ज्यांनी इतरांचे पक्ष विलिन करण्याची भाषा केली त्यानाच आज आपला पक्ष विलीन करण्याची वेळ आली. त्यांना भाजपा प्रवेशासाठी सहा महीने तारख्या द्यावा लागल्या केवळ मुख्यमंत्र्यानी अभय दिला म्हणुन त्याचा भाजप प्रवेश झाला, भाजपाच्या शिस्तीचे पालक करणे हे राणेचे कर्तव्य आहे आणि ते जरी केले तरी पुर्वीचे प्रकार जिल्हातील बंद होतील, भाजपाच्या कमळावर उभे न राहता राजन तेली यांनी ज्याप्रमाणे आपल्या प्रत्रकावर मोदीचे फोटो वापरले ते पाहता त्याची पक्षातून हकालपट्टी झाल्यास ती सगळी पत्रके बदलावी लागणार आहे. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई होणार आहे, व तसे न केल्यास आपण त्याच्यावर मी कारवाईची मागणी करणार.
ते म्हणाले, मला नारायण राणेमुळे आमदारकी मिळाली नसुन मला येथल्या जनतेने आमदार बनविले आहे आणि सावंतवाडीला पाच वेळा निवडून आलेल्या शिवराम राजेसारच्या सज्जन लोंकानी इथली आमदारकिची खुर्ची भुसविली आहे. त्यामुळे अशा प्रवित्र खुर्चीवर डाग लागलेल्या लोकांना बसण्याचा अधिकार नाही तो अधिकार येत्या निवडणुकित कोणाला द्यायचा तो लोकाच्या हाती असुन ते योग्य निर्णय घेतील. गेल्या दहा वर्षात मी आंबोली कबूलायतदार प्रश्‍न हाताळत आलो आहे माझ्या नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती शासनाने स्विकारली म्हणून हा प्रश्‍न सुटला मात्र तेली हा प्रश्प आपण सोडविल्याचे सांगत आहेत. या सपुर्ण प्रक्रियेशी त्याचा काय संबध आहे केवळ खोट बोंलण हा त्याचा गुणधर्म आहे त्यामुळे येणारा निवडूकीत जनताच त्यांना योग्य जागा दाखवतील.

4

4