Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपाचा सर्वसामान्य पदाधिकारी म्हणून काम करणार...

भाजपाचा सर्वसामान्य पदाधिकारी म्हणून काम करणार…

संजू परब; राजन तेलींना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली…!

सावंतवाडी ता.१५: आम्ही आता भाजपात प्रवेश केला आहे.त्यामुळे यापुढे सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे.आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक नाही मात्र भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेलींना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली,अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मावळते तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.परब यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी माजी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, गुरू मठकर, केतन आजगावकर,अक्षय कंठक, शंभू विरनोडकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.परब म्हणाले,मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कणकवली येथे स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष,माजी शहराध्यक्ष यांच्यासहित कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता भाजपवासी झाले आहेत,असे जाहीर केले आहे.सावंतवाडी तालुक्यासहित संपूर्ण मतदारसंघात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी काम करणार.सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवल असून हा मतदारसंघ १०० टक्के भाजपमय करू,या पक्षाच्या ध्येयधोरणेचे निश्चित पालन केले जाणार आहे.या विधानसभा निवडणुकीत राजन तेली यांना विजयी करून हे उदाहरण म्हणून शतप्रतिशत भाजप हे सत्य करून दाखवू,असे परब यांनी सांगितले.येत्या दोन दिवसात तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन त्याबद्दलची कल्पना दिली जाईल,मंगळवार पासून भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला लागणार आहे.पंचायत समिती मध्ये आमचे १० सदस्य आमच्या कडे आहेत.त्यामुळे भाजप मध्ये जायला अडथळा नाही.नगरपालिका मध्येही फरक पडणार नाही.आता पक्षात प्रवेश केल्यामुळे संघाच्या विचारधारेशी जुळवून घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत भाजप चे उमेदवार राजन तेली यांना १००% निवडून आणणार,स्वाभिमानचा प्रत्येक कार्यकर्ता हा भाजप चा कार्यकर्ता हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.त्यामुळे शहरातही तेलीना अपेक्षित मतदानाचा टप्पा गाठू देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक नसल्याचे देखील परब यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments