Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआमदारांकडून जनतेची घोर फसवणूक ; आता परिवर्तन अटळ...

आमदारांकडून जनतेची घोर फसवणूक ; आता परिवर्तन अटळ…

 हुसेन दलवाई : मोंडकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील…

मालवण, ता. १५ : विद्यमान आमदारांनी या मतदार संघातील जनतेला खोटी आश्वासने देत घोर फसवणूक केली आहे. मोंडकर हे स्थानिक उमेदवार असल्याने येथील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याने या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे असा विश्वास खास. हुसेन दलवाई यांनी आचरा येथे व्यक्त केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे युवा उमेदवार अरविंद मोंडकर
यांच्या आचरा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी खास हुसेन दलवाई, कोकण प्रभारी बी. संदीप, उमेदवार अरविंद मोंडकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, आबा मुंज, विद्याप्रसाद बांदेकर, बाळू वस्त, प्रवीण आचरेकर, चंदन पांगे, जुबेर काझी, जेम्स फर्नांडिस यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेली पाच वर्षे स्थानिक आमदारांच्या अपयशी कारभाराला व खोट्या आश्वासनाना जनता कंटाळली आहे. या मतदार संघाचा विकास आघाडीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुकीत येथील जनता निश्चितच परिवर्तन घडवेल असा विश्वास खास. दलवाई यांनी व्यक्त केला. प्रचारात जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता काँग्रेस आघाडीचे अरविंद मोंडकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments