Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासुजाण नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी मूल्यांना धारण करून जीवन जगावे...

सुजाण नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी मूल्यांना धारण करून जीवन जगावे…

मंदार सांबारी; बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत…

 

मालवण, ता. १२ : मुलांनी मोबाईलचा वापर जपून करावा व एक सुजाण नागरिक बनण्यासाठी मानवी मूल्यांना धारण करून स्वतःसाठी व इतरांसाठी कल्याणकारी जीवन जगावे असे प्रतिपादन आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष मंदार सांबारी यांनी येथे व्यक्त केले.

येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी निवड केलेल्या सत्तर लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी ८९ हजार रुपयांची आर्थिक मदत पूज्य साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित शिक्षण निधी वितरण समारंभात करण्यात आली.

या शिक्षण निधी वितरण समारंभात विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. समारंभास अध्यक्ष म्हणून वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष मंदार सांबारी, संस्थेचे आचरा परिसर प्रतिनिधी पांडुरंग कोचरेकर गुरुजी, रामचंद्र कुबल उपस्थित होते. रामगड हायस्कूलच्या शिक्षिका अंजली पारकर विद्यार्थ्यांसह उपस्थित होत्या. न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे प्राध्यापक निलेश राठोड उपस्थित होते. संस्थेच्या वतीने कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, धर्माजी कांबळी, रवींद्र बागवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मुलांचे पालकांचे शिक्षकांचे तसेच प्रमुख पाहुण्यांचे न्यू इंग्लिश स्कूल आचरा हायस्कूल तर्फे मुख्याध्यापक गोपाळ परब तसेच व्यवस्थापनाचे श्री. खांडाळेकर यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments