Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याउमेदवरांच्या निवडणूक खर्चा संबंधी बैठक संपन्न

उमेदवरांच्या निवडणूक खर्चा संबंधी बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी,ता.१५:निवडणूक खर्च निरीक्षक यांचे उपस्थितीत उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची व्दितीय तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघाची एकत्रीत बैठक दि.१५ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीस मा. श्री. रविंदर कुमार, खर्च निरीक्षक, डॉ. शिवप्रसाद खोत, समन्वय अधिकारी, जिल्हा खर्च सनियंत्रण समिती, तीनही विधानसभा मतदार संघातील सहाय्यक खर्च निरीक्षक, लेखापथक, व्हिडीओ पाहणी पथक प्रमुख तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार/प्रतिनिधी उपस्थितीत होते. सदर बैठकीमध्ये मा. खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन दिनांकापासून ते दि.१ ऑक्टोबर २०१९ पर्यंतचे सर्व खर्चाच्या लेख्यांची तपासणी पूर्ण केली. तपासणीच्या वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या दिनांक निहाय वर्तमानपत्रामध्ये दिसून आलेले कार्यकर्त्यांचा पक्षामधील प्रवेश, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, प्रचारादरम्यान गावोगावी काढण्यात येणाऱ्या प्रचार फेऱ्या, प्रचारसभा या सर्व ठिकाणी करण्यात आलेला खर्च हा उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यामध्ये नोंदविला असल्याबाबतची खात्री केली. यानंतरच्या तपासणी दरम्यान वर्तमान पत्रामध्ये दिसून आलेल्या बातम्यांचा खर्च उमेदवारांनी लेख्यात नोंदविला असलेबाबत खात्री करणार असल्याचे सांगितले. तसेच उमेदवारांनी प्रचारासाठी टी. व्ही., वर्तमानपत्रामधील न्यूज, हँडबील, फेसबूक, व्हॉट्सॲप तसेच अन्य मार्गाने केलेला खर्च हा लेख्यामध्ये नोंदवावा अशाही सूचना दिल्या. मा. खर्च निरीक्षक यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना / त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक कालावधी दरम्यान निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येणारे सर्व प्रकारचे खर्च नोंदविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, तसेच निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करणारी समिती ही उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून असलेबाबत सर्व उमेदवारांना / प्रतिनिधींना अवगत केलेले आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments