Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यालग्नाचे आमिष दाखवून मालवणातील तरुणाला दांपत्याने लुटले...  

लग्नाचे आमिष दाखवून मालवणातील तरुणाला दांपत्याने लुटले…  

८२ हजाराचे दागिने लंपास; मळगाव येथील संशयित, रत्नागिरी-अलोरे येथून ताब्यात….

 

मालवण, ता.१३ : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाचे ८२ हजार ४०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे. याप्रकरणी कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित संतोष वसंत माळकर (वय ४२) (मुळ रा.- मळगाव ता. सावंतवाडी, सध्या रा. शिर्डी) याला रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून सर्व दागिने ताब्यात घेतले असून त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मालवण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदळगाव-शेमाडवाडी येथे राहणाऱ्या रोहन विलास कोदे याचे लग्न ठरणार होते. या दरम्यान संतोष माळकर याचे रोहन कोदे याच्या घरी येणे जाणे असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. संतोष माळकर व सायली माळकर या दाम्पत्याने रोहन याचा व त्याच्या आईचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवत त्यासाठी त्याच्याकडून दागिने घेतले. रोहन याने त्यांना दागिने दिल्यानंतर त्या दोघांनीही पोबारा केला. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहन कोदे याने १० जूनला मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संतोष माळकर व सायली माळकर यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली घनश्याम आढाव यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथक रवाना करण्याबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार मालवण पोलिसांनी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबूलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद नाईक, धोंडी जानकर, सुधीर लोंढे, भक्ती शिवलकर, सुशांत पवार, सुहास पांचाळ, या पोलिसांच्या पथकाने तपास मोहीम राबवत रत्नागिरी मधील अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संशयित संतोष माळकर याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून त्याच्याकडून ६० हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १६ हजार रु. किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याची अंगठी, २७ हजार रु. किंमतीचे सोन्याचे मूर्तमणी, ३७०० रु. किंमतीची चांदीची पैंजण व जोडवी असे एकूण ८२ हजार ४०० रुपयाचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली फोर्ड गाडी असे एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित आरोपीने रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तसेच दादर सागरी पोलीस ठाणे येथेही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments