Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादाभोली येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक पूर्ववत... 

दाभोली येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक पूर्ववत… 

वेंगुर्ले,ता.१४: मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले-मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथील फॅक्टरीजवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

सकाळी ही बाब निदर्शनास येताच या मार्गावरून जाणाऱ्या वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी तातडीने सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी कोसळलेल्या दरडीतील काही दगड बाजूला करून लहान वाहनांसाठी एक बाजूने रस्ता मोकळा केला. या मदतकार्यात बाळा परुळेकर, नवीन भोने, संजय वैद्य, प्रशांत नेरुरकर, सेजल भाटकर, विक्रम गाडी, प्रकाश भानुषाली, राजा रेडकर, आनंद बोवलेकर, मिलिंद शिवलकर, संतोष साळगावकर आणि संजय भाटकर या ग्रुपमधील सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागानेही तातडीने दखल घेतली. सकाळी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील दरड पूर्णपणे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments