बांदा,ता.१४: शहरातील बांदेकरवाडी येथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या हायमास्ट पथदीपाचे लोकार्पण अनुराधा बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, आशा बांदेकर, रुपेश बांदेकर, दत्ताराम बांदेकर, निलेश बांदेकर, संजय धुरी, शामसुंदर धुरी, तसेच मनसे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलींद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बांदेकरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार असल्याने पथदिव्यांची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात होती. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला, ज्यामुळे हा सौरऊर्जेवरील पथदीप मंजूर होऊन कार्यान्वित झाला आहे.