वैभववाडीत शिवसेना महायुतीची भव्य प्रचार रॕली

99
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१६: ‘जय भवानी, जय शिवाजी…शिवसेना झिंदाबाद…आता कस वाटतय…गार गार वाटतय…मुंबई, दिल्ली, कलकत्ता…स्वाभिमान झाला बेपत्ता…वैभववाडी बाजारात मक्याची कणस…आम्ही नाही आणली भाड्याची माणस.! अशा घोषणा देत वैभववाडी शहरात शिवसेना महायुतीचे उमेदवार सतिश सावंत यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॕली काढण्यात आली. यावेळी उमेदवार सतिश सावंत यांनी प्रत्येक दुकानात जावून गाठीभेटी घेतल्या.
यावेळी रॕलीत शिवसेना लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख निलेश ऊर्फ आप्पा पराडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, भाजप नेते अतुल रावराणे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, सभापती लक्ष्मण रावराणे, संदेश पटेल, अरुण ऊर्फ आण्णा मुरकर, माजी सभापती रमेश तावडे, धनंजय हिर्लेकर, अशोक रावराणे, संदेश रावराणे, संभाजी रावराणे, समिर रावराणे, युवा सेना जिल्हा प्रमुख गितेश कडू, स्वप्नील धुरी, रंजित तावडे, दिपेश गजोबार, वैभव रावराणे, अतुल सरवटे,शंकर कोकरे, कमलाकर सरवणकर, यशवंत सुर्वे, श्रीराम शिंगरे, प्रदिप रावराणे, जगदीश पोतदार आदी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो- वैभववाडीत शिवसेना महायुतीची प्रचार रॕली. छाया- पंकज मोरे

\