पारकर, रावराणे यांची भाजपमधून हकालपट्टी….

91
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार यांची माहिती : सहा वर्षासाठी कारवाई

कणकवली, ता.१६ :

कणकवली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार असताना विरोधी उमेदवाराचा प्रचार करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे संदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडी चे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली.
श्री जठार म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांचा कणकवली दौरा झाला. यावेळी संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण संघटनमंत्री सतिष धोंड यांनी कणकवलीत येऊन या चौघांची हकालपट्टी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार या चौघांवर पुढील सहा वर्षासाठी भाजपमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हकालपट्टी करण्यापूर्वी या चौघांनाही जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा करण्यासाठी कणकवलीत बोलावले होते. यात संदेश पारकर उपस्थित राहिले मात्र इतर मंडळी आली नाहीत. दरम्यान संदेश पारकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी केला. मात्र त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. भाजपमध्ये आता संदेश पारकर आणि अतुल रावराणे हे कुठलेही नेते राहिले नाहीत. या दोघांकडे यापूर्वीदेखील कुठलीही पदे नव्हती. हे दोघेही बिन पदाचे फुल अधिकारी होते. मात्र ते आता भाजपमध्ये नाहीत असेही श्री जठार म्हणाले.

\