सावंतवाडी,ता.१६: भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ६ येथे आज मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी शाळेचे शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, मुख्याध्यापक केशव जाधव आणि सहाय्यक शिक्षिका सायली लांबर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पूनम तुयेकर, ईश्वरी तेजम, अनिशा राणे, गुरुप्रसाद तेजम, अनुष्का केरकर, सौ. सावंत, बालवाडी शिक्षिका गावडे मॅडम, मयुरेश तुयेकर, संगीता चव्हाण, सौ. साळुंखे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. यावेळी सौ. भालेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक केशव जाधव यांनी केले तर सहाय्यक शिक्षिका सायली लांबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.