सिंधुदुर्ग,ता.१६: मी उद्योजक होणारच या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद २०२५ साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड झाली आहे. भारतीय उद्योग जगतातील दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त उद्या ता. १७ जूनला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), मुंबई येथे हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.
या परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ. सुरेश हावरे, रवींद्र प्रभुदेसाई, डॉ. अजित मराठे, कैलास काटकर, संतोष पाटील आणि वीरेंद्र पवार हे मान्यवर उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा केवळ समृद्ध आणि अभिजात ऐश्वर्य मांजरेकर यांची या प्रतिष्ठेच्या परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल समस्त जिल्हावासियांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.