विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदिल व ग्रिटींग कार्ड

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलचा उपक्रम

वेंगुर्ले.ता.१६:आकाश कंदीलच्या निर्मिती बरोबरच दिवाळीचा ग्रिटींगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी वेतोरे हायस्कूलने राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा असा असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी केले.
वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलमध्ये दिवाळीचे औचित्य साधून शिक्षकांच्या कल्पकतेतून आणि विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून ज्ञानकंदिल निर्मितीचा एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कलात्मक अशाप्रकारचे विविध आकाशकंदिल व शुभेच्छा ग्रिटींग बनविले. यासाठी लागणारे सर्व साहित्य हायस्कूलकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे कार्यवाह प्रभाकर नाईक यांनी भेट देत विद्यार्थ्यांना स्वःनिर्मितीचा आनंद लुटविण्यासाठी वेतोरे हायस्कूलने उघडलेले हे दालन म्हणजे एक अभिनव उपक्रम असल्याचे उद्गार त्यांनी काढले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

\