वैभववाडी, ता.16 :
कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ आज वैभववाडी शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. ही प्रचार रॅली शिवसेना शाखेकडून बाजारपेठ फिरून पुन्हा शाखेकडे नेण्यात आली. मुंबई-दिल्ली-कलकत्ता स्वाभिमान झाला बेपत्ता, सतीश सावंत साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत यावेळी या मतदारसंघातुन सतीश सावंत यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उमेदवार सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, अतुल रावराणे, संदेश पटेल, दीपक सांडव, राजू शेट्ये, अण्णा मुरकर, नंदू शिंदे, मंगेश लोके, धनंजय हिर्लेकर, नारायण मांजरेकर, अतुल सरवडे, स्वप्नील धुरी, वैभव रावराणे, रोहित पावसकर, विशाल सावंत, बबन धुरी, संजय निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वैभववाडीत घरोघरी जाऊन भेट देत प्रचारपत्रके वाटण्यात आली.