कुडाळ, ता.१९: देवगड-हडपीड येथील निवृत्त पोलीस कर्मचारी मोहन राणे यांच्या अंगावर केरोसीन ओतून त्यांना जाळून मारल्याच्या आरोपातून मोहन नामदेव सावंत याची आज जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. ही घटना १६ सप्टेंबर २०१८ ला देवगड-हडपीड येथे घडली होती.
याप्रकरणी मोहन सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वहिवाटीच्या रागातून हा प्रकार घडला होता. मात्र घटना घडल्यानंतर तब्बल सहाव्या दिवशी राणे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सावंत याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सबळ पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या कामी ॲड. अजित भणगे, मिहीर भणगे, स्वप्ना सामंत, सुनील मालवणकर, तेजाली भणगे, आशुतोष कुलकर्णी, कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.