कुडाळ,ता.१९: माध्यमिक विद्यालय नेरूर, माड्याची वाडी या प्रशालेत यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एका अभिनव उपक्रमाने झाली. शाळेच्या प्रवेशाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आठवीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. या वर्षी आठवीत प्रवेश घेतलेल्या ३६ विद्यार्थ्यांच्या हस्ते मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माड्याची वाडी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES