Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादादागिरी करण्याचा प्रयत्न झाल्यास तोडून मोडून टाकू

दादागिरी करण्याचा प्रयत्न झाल्यास तोडून मोडून टाकू

उद्धव ठाकरेंचा इशारा,; खुनशी प्रवृत्ती हद्दपार करा राणेंवर टीका

कणकवली. ता,१६: दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तोडून-मोडून टाकू,कोकणी जनता भोळी-भाबडी आहे,परंतु अद्याप पर्यंत मर्दनगी शिल्लक आहे,हे कोणी विसरू नये,अशी टीका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,यांनी आज येथे नारायण राणे यांचे नाव न घेता केली,येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले.यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे जहरी टीका केली.पाठीत वार करणारी खुनशी प्रवृत्ती आमच्याकडे नको,हे आम्ही गेली अनेक वर्षे पाळले,परंतु त्याही पलीकडे मित्राकडे सुद्धा नको,अशी आमची मागणी होती.तरीसुद्धा त्यांना पक्षात प्रवेश देणाऱ्या भाजपला आम्ही शुभेच्छा देतो,असेही त्यांनी सूचक विधान केले.श्री ठाकरे हे आज कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.यावेळी त्यांनी सतीश सावंत,वैभव नाईक व दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन केले.

यावी उद्धव ठाकरे म्हणाले २१ तारखेची मला वाट बघण्याची गरज नाही.मी पहिले तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो.सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सोडण्याची चूक केली.अन्यथा ते आज आमदार दिसले असते.परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आता योग आला आहे.त्यामुळे ते भविष्यात नक्कीच आमदार होतील.आमच्यात आणि भाजपात कोणते वाद नाहीत भांडण झाले नाहीत.परंतु इतिहास उजळत बसण्यापेक्षा याठिकाणी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येण्याचा निर्णय मी घेतला.श्री. ठाकरे पुढे म्हणाले ज्यांना शिव सेनाप्रमुखांनी काढून टाकले होते.ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला यावी मी त्यांना काँग्रेस मध्ये घेणाऱ्या सोनिया गांधी व काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.अनुभवाचे बोल आहेत.ज्या ठिकाणी हे जातात.त्या ठिकाणी ते विरोधात बोलतात मोदींच्या विरोधात बोलले सोनिया गांधीच्या विरोधात बोलले त्यांचे इच्छा पूर्ण झाली नाही की दुसऱ्यावर टीका करायची अशी त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही.मी सातबारा कोरा करेल असे सांगितल्यानंतर काही लोकांनी माझ्यावर टीका केली.यात उद्धव ठाकरे ना सातबारा तरी कळतो का असा प्रश्न केला.परंतु दुसर्‍याच्या सातबारा माझे नाव लिहून दुसऱ्याच्या जमिनी हडप करण्याचे काम कधी केले नाही.अशी त्यांनी टीका केली.दहा रुपयात शिवसेनेकडून जेवण दिले जाईल.असा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला होता.यावर सुद्धा टीका झाली.मात्र जे मातोश्रीच्या विठ्ठला चांगले नाही.ते भविष्यात काय करतील असाही प्रश्न यावेळी केला.श्री ठाकरे पुढे म्हणाले आजपासून स्वाभिमान हा पक्ष खूश असेल.कारण ज्या लोकांनी स्वाभिमानाच्या नावावर मान वाकवली लाचारी केली.अशा लोकांपासून आपण दूर झालो.याचा त्याला अभिमान असेल.असे सांगून त्यांनी त्या भुताला तुम्ही ही मानगुटीवर बसून घेऊ नका असा सूचक सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यां दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments