वेंगुर्लेतील छत्रपती क्रिडा मंडळाचा रक्तदान उपक्रम गौरवास्पद

2

प्राचार्य केळकर यांचे प्रतिपादन

वेंगुर्ले.ता.१६: 
रक्तदान करुन गरजू रुग्णांना मोलाची मदत करणारे रक्तदाते आणि हे कार्य करणाऱ्या मंडळाचे काम निश्चितच गौरवास्पद आहे. आज आपल्या देशात असे असंख्य रुग्ण आहेत की, ज्यांना तातडीने रक्ताची गरज भासत असते. त्यामुळे छत्रपती क्रिडा मंडळाचे हे कार्य समाजासाठी आणि युवकांसाठी प्रेरणा देणारे आहे असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांनी काढले.
वेंगुर्ला येथील छत्रपती कला क्रिडा मंडळामार्फत सलग दुसऱ्या वर्षी आज येथील होमिओपॅथीक महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मंडळाच्या कार्यकर्त्यांसह अन्य नागरीकांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. के.जी. केळकर, डॉ. बी. एम. मोरे, डॉ.आकाश घाडी, रामचंद्र मालवणकर, सुरेंद्र चव्हाण, नरहरी खानोलकर आदी उपस्थित होते. रक्तदान हे केवळ श्रेष्ठदान नसून ते महादान आहे आणि त्याची किमत मोजता येणार नाही. सध्या जगभरात रक्तदानाचे महत्व वाढले असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी यावेळी दिली. छत्रपती कला क्रीडा मंडळातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच दिल्ली येथे झालेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये रघुनाथ उर्फ पिट्या कुडपकर याने रांगोळी रेखाटून वेंगुर्ल्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहचविल्याबद्दल त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी छत्रपती कला क्रिडा मंडळाच्या सुधीर पालयेकर, नरेश परब, सागर गावडे, जयराम परब, दिनेश धर्णे, विक्रांत गावडे, निखिल शिरवणकर, अजित कानडे, सागर पेडणेकर, अमये धुरी, ओंकार धर्णे, कृष्णा अणसूरकर, सागर सपकाळे, ओंकार खानोलकर, सागर धावडे, प्रितम सावंत, प्रतिराज कुडपकर, पंकज घोगळे, कुणाल पालयेकर, सुभाष आरोलकर, मिलिद रेडकर, रविद्र शिरसाट, उमेश आरोलकर, विनायक कुडपकर, योगेश नाईक, नितेश गावडे, अनिकेत सागवेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्राडी.आर.आरोलकर यांनी मानले.

4

4