जलतरणपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम…
वेंगुर्ले,ता.२१: आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले येथील नगर परिषदेच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जलतरण करत विविध योगा प्रकार सादर करत निरोगी जीवनासाठी योगा महत्वाचा असल्याचे पटवून दिले.
या अनोख्या उपक्रमाचे आयोजन प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हे योगा प्रकार पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती .आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने काहीतरी आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय श्री. सावंत व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार पाण्यात पोहताना हे योगा प्रकार करण्यात आले. या उपक्रमात डॉक्टर वामन कशाळीकर, विनया कशाळीकर , प्राची मनचेकर, बाळू खामकर संध्या खामकर, राहुल साळगावकर, राजेंद्र साळगावकर ,सोनाली साळगावकर,सुरज साळगावकर , जतिन देवजी, हेमंत मडकईकर, गुरू होडावडेकर, उल्हास तळवडेकर, पंकज घोगळे , अल्फा भानुशाली, पूजा भानुशाली, मीनल भानुशाली , गणेश तारी आदी सहभागी झाले होते.