Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानिरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली...

निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली…

सिताराम गावडे; सावंतवाडीतील ऑर्बिट योगा स्टुडिओत योगा दिन साजरा…

 

सावंतवाडी, ता.२१: निरोगी जिवन जगायचे असेल तर योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी आज येथे केले. येथील ऑर्बिट योगा स्टुडिओच्या व्दितीय वर्धापनदिनाच्या व जागतिक योगा दिनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे, डॉक्टर शिरीष चौगुले, डॉक्टर अमृता स्वार, डॉक्टर गणपत्ये, निवृत्त शिक्षक भरत गावडे, पतंजलीचे महेश भाट, वेध शाळेचे प्राध्यापक कशाळीकर, संदीप कुडतरकार ऑर्बिट योगा स्टुडिओ चे संचालक अमोल सोनवणे, विनेष तावडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. गावडे पुढे म्हणाले, योगाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाधिदेव शंकर यांनी अफाट शक्ती ही योग व ध्यानधारणेमुळे प्राप्त केली. त्यांचे तांडव नृत्य हे योग साधनेचा एक भाग आहे. शरीरातील सर्व अवयव सुदृढपणे कार्यान्वित राहायचे असतील तर गोळ्यांपेक्षा योगा त्यावर प्रभावी औषध आहे. या योगाची कास धरल्यावर निरोगी जीवनशैली आपल्याला जगता येईल. त्यासाठी तंत्रशुद्ध योगाची गरज आहे. तो योगा ह्या ऑर्बिट योगा स्टुडिओ मध्ये शिकवला जातो. त्याचा प्रत्येकाने लाभ घेणे गरजेचे आहे. तर निवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी योगामुळे जीवनशैली उत्साही बनते, उत्साह वाढतो ,सकारात्मक ऊर्जा तयार होते व शरीर निरोगी राहते असे सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने योगा करणे गरजेचे आहे. तर योगप्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी गेल्या दोन वर्षातील योगा स्टुडिओची कामगिरी विशद करून या योगामुळे अनेक जणांना अनेक आजारांवर मात करता आली, असे स्पष्ट केले. यावेळी योगा शिकण्यासाठी येणाऱ्या योगा प्रशिक्षणार्थ्यांनी नऊ ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या योगा कला सादर केल्या. त्यातून तीन ग्रुपांना नंबर देण्यात आले तर दोन ग्रुपांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व इतर ग्रुपांना सन्मानपत्र, मेडल देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर आभार प्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी माणले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments