मांगेलीचे शिवसेनेचे सरपंच भाजपात दाखल

2

गावाच्या विकासासाठी निर्णय:केसरकरांनी निधी न दिल्याचा आरोप

दोडामार्ग.ता,१७:मांगेली तळेवाडी येथील विदयमान सरपंच सुर्या गवस यांच्यासह युवक व महिलांनी भाजपात प्रवेश केला.
गावाच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतला आहे असे यावेळी गवस यांनी सांगितले.
पालक मंत्री केसरकर यांनी मांगेलीच्या पर्यटनबाबत अनेक आश्वासने दीली होती. मांगेली वर्षा पर्यटनाला एक कोटी चा निधी देणार असून जाहीर नाम्यात तसा प्रसिध्दही केला होता . मात्र पाच वर्षात पालक मंत्र्यानी फिरकूनही पाहिले नाही . वेळोवेळी या बाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात आला . मात्र केसरकर यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप गवस यांनी केला
यावेळी सुलावती गवस , शामसुंदर गवस , अशोक गवस , सेजल गवस , सुहासिनी गवस , पुंडलिक गवस, नारायण गवस , पार्वती गवस , माधुरी गवस,  अशोक गवस तसेच अन्य महिला व युवकांनी भाजप प्रवेश केला . यावेळी प्रथमेश तेली , राजेंद्र निंबाळकर , लक्ष्मण नाईक , रंगनाथ गवस ,  देवेंद्र शेटकर , दिपक गवस , संदीप नाईक , सुनिल गवस तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

6

4