केसरकरांसाठीच नगराध्यक्षपदाची खुर्ची सोडली…

2

बबन साळगावकर:दहा कोटीच्यावर निधी दिल्यास मी निवडणूकीतून माघार घेईन

सावंतवाडी.ता,१७:
पालकमंत्री दीपक केसरकर यांचा जीव अजूनही सावंतवाडी पालिकेत घुटमळतो ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे त्यांच्यासाठीच आपण नगराध्यक्षाची खुर्ची सोडली अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे केली.
दोनशे कोटीचा निधी दिला असे खोटे बोलणा-या केसरकरांनी मला पालिकेतील विकासकामासाठी फक्त दहा कोटी रुपयांचा निधी पावसाच्या तोंडावर दिला. त्यामुळे त्याचे फक्त नियोजन मी करू शकलो. याच्या पलीकडे त्यांनी निधी दिला असेल.तर त्यांनी तसे जाहीर करावे ते सत्य असल्यास मी निवडणुकीतून माघार घेईल. अन्यथा खोटे असल्यास त्यांनी आपली माघार घ्यावी असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी अर्चना घारे, पुंडलिक दळवी, संदीप राणे, सत्यजित धारणकर, सुरेश गवस,उदय भोसले, देवा टेमकर,बाबल्या दुभाषी,सचिन इंगळे,महेद्र सांगेलकर आदी उपस्थित होते.

4

4