Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनझारापमध्ये महसूलची मोठी कारवाई, २१० ब्रास अवैध वाळू साठा जप्त ..

झारापमध्ये महसूलची मोठी कारवाई, २१० ब्रास अवैध वाळू साठा जप्त ..

 

कुडाळ ता.२७: येथील महसूल विभागाने झाराप – मुस्लिमवाडी येथे मोठी कारवाई करत, बिगर परवाना असलेला २१० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री ८ वाजता ही कारवाई केली. प्राथमिक चौकशीत हा वाळूसाठा इर्शाद मुजावर (रा. झाराप ,खानमोहल्ला) याचा असल्याचे समोर आले आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, संबंधिताला नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली.

मुस्लिमवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा साठा असल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत, तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव आपल्या पथकासह गुरुवारी सायंकाळी उशिरा या परिसरात दाखल झाले. पथकात मंडळ अधिकारी जांभवडेकर, झाराप तलाठी निलेश कांबळे, झाराप पोलीस पाटील, हुमरस पोलीस पाटील आणि झाराप कोतवाल पौर्णिमा कुडाळकर यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments