Monday, July 7, 2025
Google search engine
Homeआंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र चेंबरच्या मागणीला प्राडाचा सकारात्मक प्रतिसाद...

महाराष्ट्र चेंबरच्या मागणीला प्राडाचा सकारात्मक प्रतिसाद…

ललित गांधी : कोल्हापुरी चप्पलबाबत महाराष्ट्र चेंबरचा हस्तक्षेप, मेन्स फँशन शो मधील चप्पल कोल्हापुरीच…

मालवण, ता. २७ : प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरने तातडीने इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज दिली.
प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबरला पत्रव्यवहार केला आहे. कोल्हापूरची ओळख आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे. अलीकडेच प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. तसेच मेन्स फँशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला गेला. ही चप्पल इटालियन असल्याचे भासविले गेले. या प्रकाराने प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. गांधी यांनी केला.
प्राडा ​कोल्हापुरीसारखी चप्पल​ एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे​ तर​, भारतीय कारागीर ​तीच चप्पल ४०० रुपयांत बनवतात.​ या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे ​कारागिरांत नाराजी होती. राज्यातील काही कारागीरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील आणि जगाची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलाची अस्मिता जाणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडे पत्रव्यवहार करुन वस्तुस्थिती मांडली.
प्राडामेन्स २०२५ फॅशन शोमध्ये दाखवलेले चप्पल शतकानुशतके जुना वारसा असलेल्या पारंपरिक भारतीय हस्तकला पादत्राणे आहेत. भारतीय कारागिरीचे सांस्कृतिक महत्त्व आम्हाला कळले आहे. जबाबदार डिझाइन पद्धती, सांस्कृतिक सहभाग वाढवणे आणि स्थानिक भारतीय कारागीर समुदायांशी अर्थपूर्ण देवाण घेवाणीसाठी संवाद उघडण्यास वचनबद्ध आहोत. उत्कृष्टतेचा आणि वारशाचा अतुलनीय दर्जा दर्शविणाऱ्या अशा विशेष कारागिरांना मूल्य प्राडा कडून जपले जाणार आहे. चर्चेसाठी आणि बैठकी साठी आम्ही तयार असल्याचे प्राडाने महाराष्ट्र चेंबरला कळविले आहे.
एक्स्पोमध्ये कोल्हापुरी चप्पल
कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर राज्यात एक्स्पो भरविते. त्यात मूळच्या कोल्हापुरी चप्पलची महती देश आणि जगभर पोहोचण्यासाठी एक मोठे व्यासपीठ महाराष्ट्र चेंबरकडून उपलब्ध करुन दिले जाते असेही श्री. गांधी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments