दाट धुके असल्यामुळे मदत कार्यात अडचणी:शोध लागेपर्यंत पर्यटन स्थळ बंद..
आंबोली ता.२८: येथील कावळेसाद पॉईंट परिसरात खोल दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर या तरुणाचा शोध घेण्यासाठी सकाळ पासूनच मदत कार्य सुरू केले आहे. या मदत कार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्या तरुणाचा शोध लागेपर्यंत कावळेसाद पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
सह्याद्री एडवेंचर्स आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगेली यांच्या मदतीने ही शोध मोहीम राबविण्यात येत आहे.मोठ्या प्रमाणात पाऊस आणि धुके आणि त्यात वारा असल्यामुळे शोध मोहीम राबवण्यास अडचणी येत आहे. तरीही शर्तीचे प्रयत्न करून त्या तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत,अशी माहिती आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे यांनी दिली.