तर….पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात जाईन…

87
2
Google search engine
Google search engine

शिवराम दळवी; हाॅटेलवर झालेला हल्ला,खाजगी विषय,त्याचे राजकारण नको…

सावंतवाडी ता.१७:

माझ्या हॉटेलवर व कुटुंबावर झालेला हल्ला हा माझा कौटुंबिक व खाजगी विषय आहे.त्यामुळे तो पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वारंवार उघडू नये,पुन्हा-पुन्हा त्यांच्याकडून तसा प्रयत्न झाल्यास,मी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाईन,असा इशारा माजी आमदार तथा भाजपाचे नेते शिवराम दळवी यांनी आज येथे दिला.श्री दळवी यांनी राजन तेली यांच्या प्रचार कार्यालयाला आज भेट दिली.त्यावेळी ते बोलत होते.
आपण उद्यापासून प्रचारात सहभागी होणार आहे.असेही त्यांनी सांगितले.यावेळी गोवा प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे,उमेदवार राजन तेली,तालुकाध्यक्ष महेश सारंग,राजू गावडे,राजू राऊळ,महेश धुरी आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, त्या हल्ल्याला अनेक वर्षे उलटून गेली.मात्र ज्या वेळी हा प्रकार घडला तेव्हा साधे केसरकर विचारायला सुद्धा मला आले नव्हते,मात्र निवडणुकीच्या तोंडावर ते राजकारण करत आहेत.हे चुकीचे आहे,असेही दळवी म्हणाले.