सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ सोनगेवाडी येथे प्रचार फेरी….

2

कणकवली, ता.१७ :
शिवसेना भाजप -रीपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार .सतीश सावंत यांच्या प्रचारार्थ सोनगेवाडी येथे प्रचार फेरी काढण्यात आली.शिवसैनिकांनी घरोघरी जात पत्रके वाटप करत सतीश सावंत यांना धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केले.
माजी महिला जिल्हा प्रमुख स्नेहा तेंडूलकर ,शहरप्रमुख शेखर राणे, युवासेना शहर प्रमुख तेजस लोकरे, माजी महिला शहर प्रमुख रंजिता पाटकर,अपूर्वा जाधव,नंदिनी मुसळे, दीपक वाघमारे,चाणी जाधव,रोशन जाधव,अमिता सावंत,सुप्रिया जाधव,रोशन जाधव व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

6

4