Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.२८: येथील लाडाची बाग परिसरात घुबड जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला सावंतवाडी वनविभागाच्या जलद कृती दलाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ते घुबड रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आले होते.
याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनवेल डिसोझा आणि पंकज तुळसुलकर यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी दाखल होऊन त्यांनी त्या घुबडाला ताब्यात घेतले.
Download WordPress Themes Nulled and plugins.