द्वेषभावनेने पछाडलेल्यांना त्यांची जागा दाखवा…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

निलम राणे ; हरकुळ येथे भाजपची प्रचारसभा…

कणकवली, ता. १७ :

राणे कुटुंबात प्रत्येक कार्यकर्त्याला मानसन्मान दिला.कार्यकर्ता हा कुटुंबातील सदस्य मानतो. काही लोक स्वार्थासाठी राणे विरोधी द्वेषभावनेने पछाडलेले आहेत. अशा विरोधकांना भाजप महा युतीचे उमेदवार नितेश राणे यांना प्रचंड मताने विजयी करून उत्तर द्या.असे आवाहन सौ.निलमताई राणे यांनी केले. हरकुल बुद्रुक येथील महिलांच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.हरकुळ बुद्रुक येथे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.या सभेला महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
व्यसपीठावर भाजपा महिला तालुकाध्यक् गीता कामत, पंचायत समिती सदस्य दिव्या पेडणेकर, सरपंच गौसिया पटेल, सुमेधा पाताडे, मेघा गांगण ,ग्रा प सदस्य दिपाली तावडे- दाभोळकर,गौरी तेली ,अलका खोचरे, किशोरी घाडीगावकर ,मनीष देवळी,, रिया तायशेटे ,प्रणाली घाडीगावकर, पूर्व तांबे, आदींसह भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी उपसभापती बाबा वर्देकर ,बुलंद पटेल, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, बाळा घाडीगावकर ,राजू पेडणेकर ,चंद्रकांत परब आदीं भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा विजय करून कणकवली मतदारसंघात विकासाला जोड द्या. राणे कुटुंबाने आपले आयुष्य येथील जनतेच्या सेवेसाठी खर्च केले आहे. विकास हेच स्वप्न आम्हाला सर्वांचे आहे. त्यामुळे द्वेषभावना ठेवून राणे विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन नीलमताई राणे यांनी केले.

\