उद्धव ठाकरे; राजवाड्याला भेट,शिवराम राजेंच्या आठवणींना उजाळा…
सावंतवाडी ता.१७:
येथील सौदर्य हे राजवाडयात दंडलय,त्यामुळे मला आतून राजवाडा बघण्याची इच्छा आहे.पुढच्यावेळी “मी” नक्की राजवाड्यात येईन,शिवरामराजेंचे स्मारक होत आहे.हे ऐकून आनंद झाला,असे मत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यकत केले.ठाकरे यांनी सावंतवाडीतील जाहीर सभा झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडीच्या राजवाड्याला भेट दिली.यावेळी त्याचे युवराज लखम भोसले यांनी स्वागत केले.
यावेळी तेजस ठाकरे,उद्योगमंत्री सुभाष देसाई,पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राउत,अरूण दुधवडकर,संदेश पारकर, वसंत केसरकर उपस्थीत होते.
ठाकरे म्हणाले,मला बरेच दिवस राजवाड्याला भेट देण्या ची इच्छा होती.पण वेळ मिळत नव्हता.आज हा योगा-योग जूळून आला आहे.मात्र रात्रीची वेळ असल्याने राजवाडा आतून बघता येणार नाही.मी पुन्हा कधीतरी दिवसाचा येईन तेव्हा नक्कीच राजवाडयाला आतून भेट देईन असे सांगितले.यावेळी ठाकरे यांनी शिवराम राजेंची आठवण काढली.तसेच त्याचे स्मारक राज्य सरकारच्या माध्यमातून होते, हे ऐकून आनंद झाल्याचे सांगितले.
लखम भोसले यांनीही राजवाड्याची माहीती ठाकरे यांना दिली.तसेच राजवाड्यात गजिफाचे काम सुरू असल्या बाबत सांगितले.आज ही लाकडी कलाकुसर आम्ही जिवत ठेवली आहे.यापुढे ही जिवत ठेवू ,असे ही त्यानी स्पष्ट केले.वसंत केसरकर यांनी ही लखम भोसले यांच्याबाबत ठाकरे यांना माहीती दिली.मंत्री दीपक केसरकर यांनी शिवरामराजेंच्या स्मारकासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे लखम भोसले म्हणाले.