अतुल रावराणे; पत्रकार परिषदेत लगावला टोला….
वैभववाडी ता.१७:
कोकणात शिवसेना एक नंबरचा पक्ष बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जिल्ह्यातील अपवृत्ती, दहशती विरोधात आमचा लढा आहे. जिल्ह्यातील दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आपण व आपल्या सहका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील जनतेच्या मनात आहे ते आम्ही यशस्वी करून दाखवू. आलेली भगवी लाट आता कोणीही थोपवू शकत नाही. या भगव्या लाटेत विरोधकांचे अस्तित्व नष्ट होईल. असा टोला शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले अतुल रावराणे यांनी लगावला.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित भाजपा नेते अतुल रावराणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गुरुवारी त्यांनी वैभववाडी येथील शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली.यावेळी त्यांचे व सहका-यांचे शिवसेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. तालुकाप्रमुख मंगेश लोके, सभापती लक्ष्मण रावराणे, बॕंक संचालक दिगंबर पाटील, संपर्क प्रमुख विठ्ठल बंड,वसंत मुंडले, संदेश पटेल, दिपक सांडव, संभाजी रावराणे, गिरीधर रावराणे, आदी उपस्थित होते.
यावेळी पञकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, भाजपने आमच्यावर जी कारवाई केली.ती जिल्ह्यातील निष्ठावांन कार्यकत्यांना आवडलेली नाही.चुकीचा निर्णय झाल्याची भावना कार्यकत्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.आमच्यावर कारवाई करणाऱ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा असे खोचक विधान त्यांनी केले.
खा.विनायक राऊत यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी आमचा संपूर्क करुन दिला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपप्रवृत्ती, दहशती विरोधात आमचा लढा आहे.जिल्ह्यातील दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आपण व आपल्या सहका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेने आम्ही निवडलेल्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी दिली.आता जिल्ह्यातील भाजपा ही राणेंची भाजप झाली आहे.भाजपच्या कार्यालयात कोणी बसत नाही.स्वाभिमानच्या कार्यालयात बसत आहेत.त्यामुळे स्वाभिमान व भाजपचे अनेक कार्यकर्ते वा-यावर आहेत.तर अनेकांनी घरी बसणे पसंत केले आहे.
जिल्ह्यातील दहशतवाद संपवून सुसंस्कृत जिल्हा बनविण्यासाठी तुमची सर्वांची साथ हवी.तुम्ही पक्षात या शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील.असा शब्द पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत हे सहकार क्षेञातील यशस्वी व्यक्तिमत्त्व आहे.त्यांच्यावर कोणीही दडपशाही आणली तरी ते आता एकटे नाहीत.आम्ही सर्वजन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.जिल्ह्यातील जनतेच्या मनात आहे ते आम्ही यशस्वी करुन दाखवू. आलेली भगवी लाट आता कोणही थोपवू शकत नाही.या भगव्या लाटेत विरोधकांचे अस्तित्व नष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फोटो- वैभववाडी येथे पञकार परिषदेत बोलताना अतुल रावराणे, सोबत दिगंबर पाटील , सभापती लक्ष्मण रावराणे व इतर