कणकवली, ता.१ ः धार्मिक कार्यक्रमात प्राण्यांचा बळी देऊ नका असा मेसेज व्हॉटसअॅपवर टाकल्याच्या मुद्यावरून चाकू हल्ला करण्यापर्यंतचा प्रकार आज कणकवली बांधकरवाडीत घडला. शिरवंडे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले सचिन आनंद पवार (वय ४१) हे आज सायंकाळी चारच्या सुमारास अापल्या घरी आले असता त्यांच्याच नातेवाईकांपैकी १५ ते १६ जण त्यांच्या घरी आले. यातील तिघांनी आपणास मारहाण केली. तर एकाने बकरा सोलण्याच्या सुरीने आपल्या छातीवर, पोटावर वार केले असल्याचा आरोप सचिन पवार याने केला आहे.
बांधकरवाडी येथील हल्ला प्रकाराच्या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी जखमी सचिन पवार याला कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातही ११२ क्रमांकावरून बांधकरवाडी येथे हाणामारीच्या घटनेची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार कणकवली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
कणकवली बांधकरवाडी येथे पवार कुटुंबीयांचा दरवर्षीप्रमाणे आज धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बकरा, कोंबडी आदी प्राण्यांची हत्या करू नका असा मेसेज सचिन पवार याने पवार कुटुंबियांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आज सकाळी टाकला होता. या मेसेजनंतर वादंगाला सुरवात झाली. सायंकाळी साडे तीन वाजल्यानंतर सचिन पवार हा बांधकरवाडी येथील आपल्या घरी दाखल झाला. त्यावेळी त्याचे नातेवाईक त्याच्या घरासमोर जमा झाले. तसेच मेसेज पाठविल्या प्रकरणावरून भांडण सुरू झाले. या भांडणात आपणास मारहाण करण्यात आली. तसेच छाती, पोटावर वार करून जखमी करण्यात आल्याचे सचिन पवार याचे म्हणणे आहे.
या घटनेप्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत संबधितांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
कणकवली बांधकरवाडी येथे तरुणावर चाकू हल्ला
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES