उंबर्डे माध्यमिक विद्यालयाच्या सायली शेळकेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

2

आंध्रप्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार…

वैभववाडी/प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलॅक्टिक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ज्यूनियर अॅथलॅक्टिक्स निवड स्पर्धेमधून वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे माध्यमिक विद्यालयाची कु. सायली पांडुरंग शेळके हिची १६ वर्षाखालील मुलींच्या गटात जिल्हा संघात निवड झाली आहे.
ए.एफ.आय. च्यावतीने आयोजित राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर अँथलेटिक्स् स्पर्धा दि. 23 ते 26 नोव्हेंबर २०१९ रोजी तिरूपती आंध्रप्रदेश येथे होणार आहेत. या स्पर्धेत १००० मी.धावणे क्रीडा प्रकारात कु.सायली पांडुरंग शेळके सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर करणार आहे. या यशस्वी खेळाडूला विद्यालयाचे अध्यक्ष श्री.प्रदीप दळवी , मा.मुख्याद्यापक श्री बोबडे एस. एम , श्री. पाटील एम. एन , क्रीडा शिक्षक श्री.राठोड एस.के, श्री. वाघमोडे एस .टी , श्री. नाईक एस . जी , श्री .पाटील व्ही. जी , श्री. तावडे एस.सी , श्री. समीर राऊत यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. तीच्या यशाबद्दल माध्यमिक विद्यालय , उंबर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बोबडे एस. एन यांनी तीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अॅथलॅक्टिक्स असोसिएशनचे सह.सचिव समीर ज. राऊत, क्रीडा शिक्षक श्री . राठोड एस.के व खेळाडू उपस्थित होते.या गुणवंत खेळाडूंचे , पालकांचे श्री व सौ. शेळके तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलॅक्टिक्स असोसिएशन चे अध्यक्ष रणजितसिंग राणे , सह.सचिव व जिल्हा मुख्य प्रशिक्षक तसेच श्री.फोंडकण देवी स्पोर्टस् अँकँडमी , निरोम चे संस्थापक मार्गदर्शक श्री.समीर जयवंत राऊत, कणकवली तालुका अॅथलॅक्टिक्स सदस्य बयाजी बूराण, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

14

4