कुडाळ, ता. ०५ : अष्टपैलू कलाकार आणि नृत्यगुरू भूषण विलास बाक्रे यांना पुणे येथे आयोजित समारंभात राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आज सकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेते तथा निर्माते शहाजी राजे पाटील यांच्या हस्ते भूषण बाक्रे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. भूषण बाक्रे हे गेली अनेक वर्षे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.