सावंतवाडी, ता.०५: येथील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या ता. ६ जुलैला सकाळी १० वाजता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या योजनांचा शुभारंभ आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आजवर सावंतवाडी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कोल्हापूर येथील जनतेला आधुनिक आरोग्य सेवा पुरवत मोठा उत्कर्ष साधला आहे. त्यामुळे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. राजेश नवांगुळ यांनी केले आहे.