वेंगुर्ले,ता.०५: सहकार सप्ताहाचे औचित्य साधून सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले शाखेतर्फे शहरातील रा. कृ.पाटकर हायस्कूल येथे वृक्ष वाटप व वृक्ष लागवड करून “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे स्थानिक अध्यक्ष कॅप्टन प्रताप राणे, उपाध्यक्ष श्रीमती शुभांगी गावडे, संचालक श्री देवेंद्र गावडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत धुरी, शिक्षक महेश बोवलेकर, शिक्षक समीर पेडणेकर तसेच शाखा व्यवस्थापक सौ ज्योती देसाई, कर्मचारी नितीन बेहेरे, शंकर दिपनाईक, दत्तप्रसाद तांडेल, दिपाली अभ्यंकर, काजल गिरप, अन्विता चेंदवणकर, प्रशालेचे कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.