Monday, July 7, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीतिलारी भटवाडी-घोटगेवाडी तिठ्यावर अपघात, दोन कृषी कर्मचारी जखमी...

तिलारी भटवाडी-घोटगेवाडी तिठ्यावर अपघात, दोन कृषी कर्मचारी जखमी…

दोडामार्ग, ता. ०५ : तिलारी भटवाडी- घोटगेवाडी तिठ्यावर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चारचाकी आणि दुचाकी यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन कृषी कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने साटेली- भेडशी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा- बांबुळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments