मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही….

2

बिग्रेडिअर सुधीर सावंत : काँग्रेस नेत्यांशी अजून चर्चा नाही…

कणकवली, ता.18:

मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबतची बोलणीही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच इतर कुठलेही पद माझ्याकडे असण्याचा प्रश्‍नच येत नाही असा खुलासा ब्रिगेइडर सुधीर सावंत यांनी आज येथे केला.
कणकवलीत पत्रकारांशी बोलताना सुधीर सावंत म्हणाले, आप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीयनेते मल्लीकार्जून खरगे व इतर काँग्रेस पदाधिकार्‍यांशी आपण दिल्ली येथे चर्चा केली होती. काँग्रेस पदाधिकार्‍यांसोबत आपण औपचारिक बैठक देखील घेतली. पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आपली चर्चा झाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेशाचा मुद्दा चर्चेला आला नाही. आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी म्हणून काम केलंय. त्यामुळे जिल्हाध्यक्ष वगैरे पदांवर मी असूच शकत नाही. तसेच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व अफवा असल्याचेही श्री.सावंत म्हणाले.

4

4