केसरकरांना काळे झेंडे दाखविणाऱ्यानाच शिवसेनेत प्रवेश

90
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाळू देसाई;राजन तेली यांच्या प्रचारातील आघाडीचा धसका

वेंगुर्ले.ता.१८: भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यामुळेच ज्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले होते त्यांनाच सेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश देण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
मोचेमाड खाडीत वाळू व्यवसाय करून मोचेमाड, अणसुर, तुळस, असोली, शिरोडा भागातील गरीब वाळू व्यावसायिक उदरनिर्वाह चालवतात. शासनाकडून रीतसर टेंडर झाल्यावर ठरलेली शासनाची रॉयल्टी हे वाळू व्यवसाईक भरतात. मात्र तिम्बलो यांच्याशी असलेल्या हितसंबंधामुळे केसरकर यांनी त्यांना त्रास होऊ नये म्हणून मोचेमाड खाडीत लागलेले टेंडर रद्द केले. परिणामी या वाळू व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाला. याच्या रागातून २८ जून २०१८ रोजी उभादांडा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री केसरकर याना या वाळू व्यावसायिकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला होता. या रागामुळे आज पर्यंत हा व्यवसाय बंद असून वाळू व्यवसाईकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान सध्या विधानसभेच्या प्रचारात राजन तेली यांनी मतदार संघ पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच त्यांचे स्थानिक पदाधिकारी केसरकर यांची दिशाभूल करून मिळेल त्याचा प्रवेश सेनेत दाखवत आहेत.काल अणसुर येथे ज्या वाळू व्यावसायिकांनी केसरकर यांना काळे झेंडे दाखविले होते ते रवींद्र गावडे, सुनील गावडे, सत्यविजय गावडे, योगेश गावडे, गोपाळ गावडे, रवींद्र गावडे यांनाच प्रवेश दिला असल्याची टीका देसाई यांनी केली. तसेच नुकत्याच मोचेमाड येथील प्रवेश कार्यक्रमात त्या गावच्या सरपंच या शिवसेनेच्या असतानाही त्यांचा प्रवेश पुन्हा दाखविण्याची वेळ या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भांभावलेल्या शिवसेनेमुळे राजन तेली यांचा विजय निश्चित असल्याचे देसाई यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी साईप्रसाद नाईक, बाबा राऊत, प्रशांत खानोलकर,वाळू व्यावसायिक विजय सरमळकर, बिट्टू गावडे, कल्पेश डेरे आदी उपस्थित होते.

\