कोळंब-न्हिवेतील राणेसमर्थक अडकले शिवबंधनात…

91
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश…

मालवण, ता. १८ : कोळंब पंचायत समिती मतदार संघातील न्हिवे परिसरातील असंख्य राणे समर्थकांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. यावेळी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे न्हिवेत भाजपला खिंडार पडले आहे.
न्हिवेतील प्रथमेश लाड, सागर परब, शेखर पाताडे, राजन दळवी, राकेश लाड, श्रीपाद नेमळेकर, सिद्धेश पाताडे, रुपेश कातवणकर, गुणेश गांगण, स्वप्नील परब, अर्जुन लाड, प्रतीक पाताडे, रोशन नेमळेकर, स्वप्नील दळवी, चेतन परब, नितीन नारकर, भीमा शिंदे, श्रीधर परब, संजय परब, संतोष परब यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांच्या विकासाभिमुख कार्याने प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले.

\