सावंतवाडीत “सराई” हंगामात सुद्धा पावसाचा जोर कायम

88
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१८: ऐन सराईच्या हंगामात आज शहरासह नजीकच्या परिसरात दमदार पावसाने आपली हजेरी लावली.तब्बल दोन तास पावसाची संततधार कायम राहिली आहे.त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडवली.तर नागरिकांची सुद्धा मोठी गैरसोय झाली आहे.

आज सकाळपासूनच वातावरणात कमालीचे बदल जाणवत होते.दरम्यान दुपारी गडगडाटासह मुसळधार पाऊस दाखल झाला.ऐन सराईच्या हंगामात सुद्धा पाऊस कायम राहिल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.अचानक येणाऱ्या या पावसाचा भात कापणीत व्यत्यय येत आहे.तर भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे.

\