कणकवली, ता.18 ः कणकवली शहर तसेच तालुक्यात आज सायंकाळी वादळीवार्यासह मुसळधार पाऊस झाला. यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील आयनल मणेरवाडी गावात अनेक घरांचे पत्रे, कौले उडून स्थानिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तर दुपारी तीन वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. यात भात कापणीसाठी शेतकर्यांना माघारी परतावे लागले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत वादळी वार्यासह प्रचंड पाऊस झाल्याने अनेक भागातील तयार भातशेती आडवी झाली आहे. दरम्यान आयनल मणेरवाडी गावातील नागरिकांना आजच्या पावसाचा मोठा तडाखा सहन करावा लागला. गावात ठिकठिकाणी वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा ठप्प झाला आहे. मणेरवाडीतील अमर सेवा मंडळ आयनल मनेरवाडी कार्यालयाचे पत्रे उडाले. सुरेश मुणगेकर याच्या घराचे वासे मोडून कौले फुटली, उदय मसुरकर याच्या घराचे पत्रे फुटले, अरविंद ओटवकर, विलास हडकर यांचे माडाचे झाड कोसळले.
कणकवली तालुक्यात वादळीवार्यासह मुसळधार पाऊस
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.